वैभववाडीत पारंपारिक पद्धतीने वटपौर्णिमा होतेय साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वटपौर्णिमेला आज शनिवारी सकाळी ११.१७ वाजता प्रारंभ झाला असून उद्या रविवारी सकाळी ९.११ वाजेपर्यंत पौर्णिमेचा कार्यकाळ आहे. वटवृक्षाच्या पूजेसाठी आज शनिवारी सायंकाळी ५.४५ पर्यंत मुहूर्त असल्याने आज दुपारच्या सत्रात मोठ्या संख्येने वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनी महिला पारंपारिक पद्धतीने वडाच्या झाडाची भक्ती भावाने पूजा करण्याबरोबरच झाडा सभोवती प्रदक्षिणा घालत त्याला सुताचा धागा बांधून आपल्या पतीच्या सुख समृद्धी व दीर्घायुष्यासाठी तसेच हा पती सात जन्म मिळावा, अशी प्रार्थना करत आहेत. त्यामुळे आज वटपौर्णिमेच्या दिवशी वैभववाडी शहर व ग्रामीण
भागात असलेल्या वटवृक्षांच्या ठिकाणी सुहासिनी महिलांची वटपूजेसाठी गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

error: Content is protected !!