कुडाळ (अमोल गोसावी) : नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कुडाळचा सुपुत्र आदित्य बटावले महाराष्ट्रातील अतिशय अवघड अशा चंदेरी किल्ला शिखरावर सोमवार, ५ जून रोजी सायकलद्वारे चढाई करणार आहे. आदित्य हा सर्व ८०० मीटर चढाईचा प्रवास मावळ्याच्या वेशात करणार असून यासाठी महाराष्ट्र रेंजर्सची टीम नियोजन करणार आहे. ५ जून रोजी सकाळी आदित्य हा प्रवास सुरू करेल.आदित्यने यापूर्वी राज्यातील अनेक गड किल्ले सायकलद्वारे सर केले आहेत. याद्वारे आदित्य छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देत आजच्या युगात सायकलचे महत्त्व किती आहे हे पटवून देतो.













