आचरा (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्थेच्यावतीने सिंधुदुर्गातील पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संस्था, मंडळे, जी ‘झाडे लावा झाडे जगवा, गडकिल्ले स्वच्छता, नदी सागर स्वच्छता, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरीब-अंध-अपंग-गरजूंना अन्नधान्य वाटप करतात, खेळ माध्यमातून शाळा, मंदिरे यांना मदत करतात, सर्प मित्र, रोजगार मेळावे लावतात, अश्या संस्थांचा सत्कार समारंभ सन्मानचिन्ह देऊन कुडाळ येथे 2 जुलै रोजी आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे आयोजन नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग ता कुडाळ यांनी केले आहे अधिक माहिती साठी “गुरु सडवेलकर” 8689819176 यांच्याशी संपर्क निवडक फोटो सोबत पाठवावेत असे आवाहन वरील संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्था सिंधुदुर्गचा अभिनव उपक्रम










