केवळ 699 रुपयात होणार पंचकर्म उपचार पद्धती
1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान कणकवली कुडाळ सावंतवाडी केंद्रावर होणार चिकित्सा
कणकवली (प्रतिनिधी) : वातव्याधींसाठी माधवबागच्यावतीने खास पंचकर्म शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी, 2023 यादरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे शिबिर उपलब्ध असून यात केवळ 699 रुपयांत पंचकर्म उपचार पद्धती व्याधीग्रस्तांना उपलब्ध होणार आहे.
वाताचे विकार जसे की, सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे, सूज येणे, हालचाल करताना सांध्यांमधून आवाज येणे, कंबर दुखी, पाठ दुखी, सांध्यांमध्ये गॅप, मान दुखी, फ्रोजन शोल्डर, अंग लुळे पडणे, नसा कमकुवत होणे, स्पॉडिलोसिस इत्यादींसाठी पंचकर्मच चिकित्सा थेरपी या उपचार पद्धतीमध्ये उपलब्ध होणार आहे. या उपचार पद्धतीमध्ये शरीरातील स्नायूंना पोषक तत्वे आणि रक्त पोचवण्यासाठी व मांस पेशींना ताकद मिळवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने औषधी तेलाने मसाज केला जातो. काढ्याने वाफ दिली जाते. त्यामुळे सांध्यांच्या हालचालीमध्ये सुधार होतो. या पंचकर्म उपचार पद्धतीचा लाभ वातव्याधीग्रस्तांनी घ्यावा, असे आवाहन माधवबागच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून कुडाळ 9011328581, कणकवली 9373183888 आणि सावंतवाडी 7774028185 या नंबरवर संपर्क साधावा.