कोलगावात गोवा बनावटीच्या दारुसह युवक ताब्यात

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटी दारूचा साथ आणि वाहतूक ही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान बेकायदा गोवा बनावटीच्या दारू विक्री करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कोलगावात एकावर कारवाई केली आहे. यशवंत सावंत रा. कोलगाव फणसवाडी असे त्यांचे नाव आहे.

त्यांच्याकडून ५ हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली असून येथील पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!