ओरोस (प्रतिनिधी): घरी जात असलेल्या महिलेला मागून घट्ट मिटी मारीत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी पिंगुळी शेटकऱवाडी येथील २६ वर्षीय सुदाम सुंदर मोर्ये याला अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस डी चव्हाण यांनी दोषी ठरविले आहे. तीन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद, अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून नितीन कुंटे यांनी काम पाहिले. १८ मे २०१८ रोजी हा गुन्हा घडला होता. आरोपी सुदाम यांना १९ मे २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. सदर महिला पिंगुळी शेटकऱवाडी मार्गे आपल्या घरी निघालेली असताना आरोपीने हे कृत्य केले होते. तपशील अधिकारी म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक जी जी पाटील यांनी काम पाहिले.
सुदाम सुंदर मोर्ये याला तीन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड












