माजी आम.प्रमोद जठार, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी केली रिंगरोड जागेसाठी पाहणी
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असून पंचक्रोशीतील एक प्रसिद्ध बाजरपेठ म्हणून खारेपाटण कडे पाहिले जाते.खारेपाटण बाजारपेठेवर आजूबाजूची अनेक गावे अवलंबून आहेत.खारेपाटण हे ठिकाण जिल्हयाचे प्रवेशद्वार असल्याने अनेक ग्राहक नागरिक खारेपाटण मध्ये येत असतात.खारेपाटण बाजरपेठेमध्ये असणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी ला जास्त प्रमाणात येथे तोंड द्यावे लागत आहे. यासाठी पर्याय म्हणून अनेक वर्षे झाली रिंगरोड ची संकल्पना अमलात आणण्याची गरज आहे अशी मागणी जोर धरू लागली होती.सध्या ची बाजारपेठेच्या वाहतूक कोंडी ची अवस्था बघता रिंगरोड ची गरज अत्यावश्यक असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.हे लक्षात घेऊन आज दि.१८ जून रोजी माजी आम.प्रमोद जठार ,कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी रिंगरोड साठी च्या पर्यायी जागेची पाहणी केली.
तसेच कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी जागेची पाहणी करून सर्व्हे करण्याचेही आदेश दिले.यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस रवी शेट्ये,खारेपाटण येथील राजू वरुणकर ,भाऊ राणे,प्रशांत गाठे,परवेज पटेल,रमेश ढेकणे आदी उपस्थित होते.या रिंगरोड मुळे वाहनांना अजून एक पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्याने बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी ची समस्या मिटेल आणि जी जड वाहने आहेत त्यांना ही प्रवास करणे सोपे पडणार आहे.एकूणच आपण पाहिलं वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोड उपयोगी येणार आहे.
खारेपाटण घोडेपथर बंदर येथून शुक नदीच्या किनाऱ्यावर धुप प्रतिबंधक संरक्षक भिंत बांधून खारेपाटण चव्हाटा ते जैन पार सार्वजनिक स्मशानभूमी पर्यंत काल भैरव मंदिर मार्गे मुंबई – गोवा महामार्गला हा थेट रस्ता जोडण्यात येणार असून सदर रस्ता खारेपाटण बजरपेठेच्या बाहेरून जात असल्याने अवजड वाहनांना आता थेट खारेपाटण बजरपेठेत प्रवेश मिळणार असून या होंनाऱ्या संभाव्य रिंग रोड मुळे खारेपाटण बाजारपेठेला पुन्हा उर्जित अवस्था प्राप्त होणार आहे.
तसेच खारेपाटण गावाला पर्यटनाच्या दृष्टीने वाव मिळावा म्हणून येथील इतिहासात किल्ला व खारेपाटण येथील ऐतिहासिक प्राचीन दुर्गादेवी मंदिर परिसराचे देखील सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.













