बांदा (मंगल कामत) संपूर्ण महाराष्ट्रात सुक्या दुष्काळाचे सावट आहे. परंतु गंभीर बाब सिंधुदुर्ग जिल्हा बाबत घडली असून इतिहासात प्रथमतः सिंधुदुर्ग जिल्हा हा दुष्काळाच्या ट्रिगर – 1 मध्ये आला असून जिल्ह्याची सरासरी तुट 16.6 असून भविष्यात योग्य उपाययोजना न झाल्यास सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यातसंपूर्ण महाराष्ट्रात सुक्या दुष्काळाचे सावट आहे. परंतु गंभीर बाब सिंधुदुर्ग जिल्हा बाबत घडली असून इतिहासात प्रथमतः सिंधुदुर्ग जिल्हा हा दुष्काळाच्या ट्रिगर – 1 मध्ये आला असून जिल्ह्याची सरासरी तुट 16.6 असून भविष्यात योग्य उपाययोजना न झाल्यास सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात पाण्याबाबत भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे . . . .यात आशेचा दिवा म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश जी राणे यांना या समस्येचे गांभीर्य कळल्याने ते व कुडाळचे आमदार निलेश जी राणे जातीनिशी मैदानात उतरले असून वस्तूनिष्ठ परीक्षण स्वतः करत असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करीत आहेत. मात्र खेद याचा वाटतो की सावंतवाडी चे आमदार याबाबत उदासीन दिसत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सेनापती मैदानात आहेत परंतु त्यांचे सरदार म्हणजे पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे मात्र नेत्यांसोबत दौऱ्यात उपस्थित राहून फोटो सेशन करत आहेत. स्वतःहून या विषयाचे गांभीर्य न कळल्याने कोणत्याही गावात वैयक्तिक संपर्क साधला नाही परंतु वरिष्ठांच्या आदेशामुळेच हे स्वतःहून गावात फिरून व फॉर्मॅलिटी म्हणून वस्तुस्थिती बघणार आहेत. या निवडून आलेल्या स्थानिक लोकनेत्यांना शेतकऱ्यांची देणे घेणे काही नाही . . . .मात्र यामध्ये सर्वात जबाबदारी वाढली आहे ती कृषी खात्याची. त्या कर्मचाऱ्यांची मात्र झोप उडणार आहे. कालच्या नवीन आकृतीबंधात कृषी सहाय्यकांची संख्या कमी करणाऱ्या शासनाचे धोरण कसे चुकीचे होते हे सांगणारी ही परिस्थिती आहे. आणि भविष्यात वारंवार हेच घडणार असून शेतामध्ये बांधावर जाणाऱ्या नवकल्पना घेऊन जाणाऱ्या कृषी सहाय्यकांची संख्या वाढविणे हा एकच पर्याय शासनासमोर राहणार आहे. . . . हे सर्व सांगण्या मागचा एकच उद्देश सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दुष्काळ ट्रिगर – 1 मध्ये जिल्ह्याचा समावेश झाला आहे. . . . दुष्काळ ट्रिगर – 1 म्हणजे पाऊस कमी पडल्याचे पहिले लक्षण. पावसाळा संपल्यावर म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत तालुक्यातील पाऊस तपासला जातो. ट्रिगर – 1 साठी पुढील निकष आहेत. १ ) तालुक्याच्या सरासरी पावसाच्या 75 टक्के पेक्षा कमी पाऊस पडला तर. उदाहरणार्थ तालुक्याचा सरासरी पाऊस 2000 मिलिमीटर असेल व पाऊस १५०० मिलिमीटर पेक्षा कमी पडला तर ट्रिगर एक लागतो. २ )पावसाळ्यात सलग तीन चार आठवडे पावसाचा मोठा खंड पडला तर ट्रिगर एक लागतो. . . . यामध्ये दोडामार्ग तालुक्याच्या पावसाची सरासरी चार हजार दोनशे मिलिमीटर असताना यंदा 3427 मिलिमीटर पाऊस पडला. सावंतवाडी मध्ये सरासरी 3800 मिलिमीटर असताना 3200 मिलिमीटर पाऊस पडला. इथे सावंतवाडी व दोडामार्ग मध्ये 81 टक्के पाऊस पडला म्हणजे 75 टक्के पेक्षा 6 टक्के जास्त पाऊस झाला तरीही हे दोन्ही तालुके ट्रिगर एक मध्ये आले कारण जून जुलैमध्ये सरासरी भरली तरीही ऑगस्टमध्ये 49% तूट पडली. भाताच्या वाढीच्या काळात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला त्यामुळे हे दोन्ही तालुके ट्रिगर एक मध्ये समाविष्ट झाले . . . .आंबोलीची सरासरी 7500 मिलिमीटर असतानाही यंदा तिथेही 1300 मिलिमीटर पाऊस कमी पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पावसाची एकूण सरासरी 4161 किलोमीटर असून प्रत्यक्ष पाऊस मात्र 3472 मिलिमीटर पडला आहे त्यामुळे सरासरी तुट 16.6 एवढी आहे . . . .सर्व मंडळात म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी बांदा इन्सुली आंबोली दाणोली मळगाव ही सहा मंडळे व दोडामार्ग मधील दोडामार्ग तळकट व सासोली ही तीन मंडळ मिळून नऊ ही मंडळात 15 टक्के पेक्षा जास्त तूट पडल्याने हे तालुके दुष्काळ ट्रिगर एक मध्ये आले आहेत . . . .परंतु हे दोन्ही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करायचे असतील तर ट्रिगर एक + ट्रिगर दोन त्या तालुक्याला लागले तरच तो तालुका अधिकृतपणे दुष्काळग्रस्त जाहीर होतो . . . .ट्रिगर दोनच्या प्रक्रियेमध्ये जमिनीतील ओलावा व विहिरीची पातळी तपासली जाईल उपग्रहाने पीक स्थिती तपासली जाईल व तिसरा म्हणजे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष पीक पाहणी (क्रॉप कटिंग)करून तेव्हा जर 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान दिसले तर तो गाव दुष्काळी जाहीर होईल. . . .सगळ्यात जास्त तूट सासोली मंडळ 18.4% तर सगळ्यात कमी तूट सावंतवाडी मंडळ 15.2 % एवढी आहे . . . . या संपुर्ण लिखाणाचा उद्देश एवढाच शासनाला शेतकऱ्यांना मदत करणे भागच आहे, नव्हे ते त्याचे कर्तव्यच आहे. पण यात आपली भूमिका काय ? कि निव्वळ शासनावर अवलंबून रहायच ? शासनाला काय करायच ते करूंदे पण आपण सर्व गावातील शेतकरी एकत्र येऊन जुन्या जाणत्यांचा अनुभव ऐकून, मार्गदर्शन ऐकून तातडीने पाणी अडविण्याचा व जिरविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुळात फुकट मिळणारे पाणी पण जपून वापरणे आवश्यक आहे. गावातील छोट्या ओहोळांवर लक्ष केंद्रित करून पाणी साठविण्याचे तंत्र अवलंबिले पाहिजे . कृषी खात्याच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. आपण सर्वजण एकञ येऊन निसर्गाचे आव्हान स्विकारूया व शेती – मानव वाचवुया. आपला स्नेहांकित – विलास सावंत – डिंगणे. पाण्याबाबत भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे . . . .यात आशेचा दिवा म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश जी राणे यांना या समस्येचे गांभीर्य कळल्याने ते व कुडाळचे आमदार निलेश जी राणे जातीनिशी मैदानात उतरले असून वस्तूनिष्ठ परीक्षण स्वतः करत असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करीत आहेत. मात्र खेद याचा वाटतो की सावंतवाडी चे आमदार याबाबत उदासीन दिसत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सेनापती मैदानात आहेत परंतु त्यांचे सरदार म्हणजे पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे मात्र नेत्यांसोबत दौऱ्यात उपस्थित राहून फोटो सेशन करत आहेत. स्वतःहून या विषयाचे गांभीर्य न कळल्याने कोणत्याही गावात वैयक्तिक संपर्क साधला नाही परंतु वरिष्ठांच्या आदेशामुळेच हे स्वतःहून गावात फिरून व फॉर्मॅलिटी म्हणून वस्तुस्थिती बघणार आहेत. या निवडून आलेल्या स्थानिक लोकनेत्यांना शेतकऱ्यांची देणे घेणे काही नाही . . . .मात्र यामध्ये सर्वात जबाबदारी वाढली आहे ती कृषी खात्याची. त्या कर्मचाऱ्यांची मात्र झोप उडणार आहे. कालच्या नवीन आकृतीबंधात कृषी सहाय्यकांची संख्या कमी करणाऱ्या शासनाचे धोरण कसे चुकीचे होते हे सांगणारी ही परिस्थिती आहे. आणि भविष्यात वारंवार हेच घडणार असून शेतामध्ये बांधावर जाणाऱ्या नवकल्पना घेऊन जाणाऱ्या कृषी सहाय्यकांची संख्या वाढविणे हा एकच पर्याय शासनासमोर राहणार आहे . . . .हे सर्व सांगण्या मागचा एकच उद्देश सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दुष्काळ ट्रिगर – 1 मध्ये जिल्ह्याचा समावेश झाला आहे . . . .दुष्काळ ट्रिगर – 1 म्हणजे पाऊस कमी पडल्याचे पहिले लक्षण. पावसाळा संपल्यावर म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत तालुक्यातील पाऊस तपासला जातो. ट्रिगर – 1 साठी पुढील निकष आहेत. १)तालुक्याच्या सरासरी पावसाच्या 75 टक्के पेक्षा कमी पाऊस पडला तर. उदाहरणार्थ तालुक्याचा सरासरी पाऊस 2000 मिलिमीटर असेल व पाऊस १५०० मिलिमीटर पेक्षा कमी पडला तर ट्रिगर एक लागतो. २)पावसाळ्यात सलग तीन चार आठवडे पावसाचा मोठा खंड पडला तर ट्रिगर एक लागतो . . . .यामध्ये दोडामार्ग तालुक्याच्या पावसाची सरासरी चार हजार दोनशे मिलिमीटर असताना यंदा 3427 मिलिमीटर पाऊस पडला. सावंतवाडी मध्ये सरासरी 3800 मिलिमीटर असताना 3200 मिलिमीटर पाऊस पडला. इथे सावंतवाडी व दोडामार्ग मध्ये 81 टक्के पाऊस पडला म्हणजे 75 टक्के पेक्षा 6 टक्के जास्त पाऊस झाला तरीही हे दोन्ही तालुके ट्रिगर एक मध्ये आले कारण जून जुलैमध्ये सरासरी भरली तरीही ऑगस्टमध्ये 49% तूट पडली. भाताच्या वाढीच्या काळात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला त्यामुळे हे दोन्ही तालुके ट्रिगर एक मध्ये समाविष्ट झाले . . . .आंबोलीची सरासरी 7500 मिलिमीटर असतानाही यंदा तिथेही 1300 मिलिमीटर पाऊस कमी पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पावसाची एकूण सरासरी 4161 किलोमीटर असून प्रत्यक्ष पाऊस मात्र 3472 मिलिमीटर पडला आहे त्यामुळे सरासरी तुट 16.6 एवढी आहे . . . .सर्व मंडळात म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी बांदा इन्सुली आंबोली दाणोली मळगाव ही सहा मंडळे व दोडामार्ग मधील दोडामार्ग तळकट व सासोली ही तीन मंडळ मिळून नऊ ही मंडळात 15 टक्के पेक्षा जास्त तूट पडल्याने हे तालुके दुष्काळ ट्रिगर एक मध्ये आले आहेत . . . .परंतु हे दोन्ही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करायचे असतील तर ट्रिगर एक + ट्रिगर दोन त्या तालुक्याला लागले तरच तो तालुका अधिकृतपणे दुष्काळग्रस्त जाहीर होतो . . . .ट्रिगर दोनच्या प्रक्रियेमध्ये जमिनीतील ओलावा व विहिरीची पातळी तपासली जाईल उपग्रहाने पीक स्थिती तपासली जाईल व तिसरा म्हणजे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष पीक पाहणी (क्रॉप कटिंग) करून तेव्हा जर 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान दिसले तर तो गाव दुष्काळी जाहीर होईल . . . .सगळ्यात जास्त तूट सासोली मंडळ 18.4% तर सगळ्यात कमी तूट सावंतवाडी मंडळ 15.2 % एवढी आहे . . . . या संपुर्ण लिखाणाचा उद्देश एवढाच शासनाला शेतकऱ्यांना मदत करणे भागच आहे, नव्हे ते त्याचे कर्तव्यच आहे. पण यात आपली भूमिका काय ? कि निव्वळ शासनावर अवलंबून रहायच ? शासनाला काय करायच ते करूंदे पण आपण सर्व गावातील शेतकरी एकत्र येऊन जुन्या जाणत्यांचा अनुभव ऐकून, मार्गदर्शन ऐकून तातडीने पाणी अडविण्याचा व जिरविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुळात फुकट मिळणारे पाणी पण जपून वापरणे आवश्यक आहे. गावातील छोट्या ओहोळांवर लक्ष केंद्रित करून पाणी साठविण्याचे तंत्र अवलंबिले पाहिजे. कृषी खात्याच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. आपण सर्वजण एकञ येऊन निसर्गाचे आव्हान स्विकारूया व शेती – मानव वाचवुया. आपला स्नेहांकित – विलास सावंत – डिंगणे.
सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच दुष्काळ ट्रिगर-१; १६.६ टक्के पावसाची तूट










