डिजिटल मीडियातील कॅमेरामन आनंद तांबे यांना पितृशोक
कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील असलदे बौध्दवाडी येथील सेवानिवृत्त पोस्ट मास्तर दत्तात्रय गंगाराम तांबे (वय – ८३ ) यांचे आज बुधवारी दु. १२:३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवस ते आजारी होते. मात्र त्यांची प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. डिजिटल मीडियातील कॅमेरामन आनंद तांबे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.













