युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

संदेश सावंत, संजना सावंत यांच्या असते स्मार्ट वॉच, भेटवस्तू देऊन करण्यात आले सन्मानित

सिंधुदुर्गात २ लाख वह्यांचे होतकरू गरजू विद्यार्थ्यांना करणार मोफत वाटप

कणकवली (प्रतिनिधी): युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आणि जिजाऊ शैक्षणीक सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्यावतीने आज बुधवार दिनांक २१ जुन २०२३ रोजी माध्यमिक विद्यालय कनेडी, सांगवे येथे मा संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत यांच्या हस्ते १० वी व १२ वी परीक्षेतील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच व इतर स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्याना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे १० वि १२ वि परीक्षेत १००% निकाल लावल्याबद्दल कनेडी मध्यामिक विद्यालयातील मुख्याध्यापक सुमन दळवी सर व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जिजाऊ शैक्षणीक सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हात २ लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी मार्गदर्शन करताना संदेश सावंत यांनी विद्यार्थ्याना कोणतीही अडचण आली तर आपल्याकडे यावे मोठा भाऊ म्हणून मी नेहमीच मदतीसाठी तयार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांनी उपक्रमाचे कौतुक करून युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत वर्षभर चालणाऱ्या शैक्षणीक उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी डी सावंत, गणपत सावंत गुरुजी,आर एस सावंत, विभागीय अध्यक्ष विजय भोगटे , सरपंच संजय ऊर्फ बाबू सावंत, सुरेश ढवळ, मंगेश बोभाटे, स्मिता मालडीकर राजश्री पवार,मुख्याध्यापक सुमन दळवी, निरीक्षक बायाजी बुरान परिसरातील शिक्षणप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!