चौके ( अमोल गोसावी ) : भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रसिका गोसावी आणि सौ परब मॅडम यांनी प्रत्यक्षिके घेतली. यावेळी परब मॅडम यांनी योगाचे महत्व समजावून सांगितले. या कार्यक्रमच्या निमित्ताने अथलेटिक शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
चौके हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा












