सिलिंग फॅन तुटून अंगावर पडल्याने देवगड पनवनक्की येथील अंजली चिंदरकर यांचे निधन

देवगड (प्रतिनिधी) : झोपलेल्या अवस्थेत सिलिंग फॅनचा गड्डा तुटून कुशीवर पडल्याने बरगड्या तुटून देवगड पनवनक्की सुमतीनगर येथील अंजली अशोक चिंदरकर (६३) या महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना बुधवारी सकाळी ७ वा.सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, अंजली चिंदरकर या पवनचक्की सुमतीनगर येथे पती व मुलासमवेत राहत होत्या. तब्येत बरी नसल्याने त्या आपल्या राहत्या घरात झोपल्या होत्या. बुधवारी सकाळी ७ वा.सुमारास त्या झोपलेल्या ठिकाणी असलेल्या सिलिंग फॅन पाईपचा स्क्रु गंजल्याने फॅनचा गड्डा तुटून त्यांचा कुशीवर जोरात पडला. या गड्डयाचा कुशीवर पडल्याने आतील बरगड्यांना जोरात मार लागल्याने त्या जोरजोरात कळवळत असताना त्यांचे पती अशोक चिंदरकर व मुलगा यांनी त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यु झाला.फॅनचा गड्डा तुटून कुशीवर पडल्याने बरगड्यांना जोराचा मार लगाला.बरगड्या फॅक्चर होवून छातीत रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारापुर्वीच त्याचा मृत्यु झाला अशी माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वीटकर यांनी दिली.

अंजली चिंदरकर या भाजपाचा प्रभाग १२ क्रमांकच्या त्या महि{ला बुथ अध्यक्ष होत्या. त्यांचा पश्चात पती,मुलगा व चार विवाहित मुली आहेत.त्यांचे पती हे मोलमजुरी करीत असून मुलाचे जामसंडे येथे केशकर्तनालय आहे. याबाबत पती अशोक अनंत चिंदरकर यांनी देवगड पोलिस स्थानकात खबर दिली.पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून अधिक तपास पो.हे.कॉ.आशिष कदम करीत आहेत.

error: Content is protected !!