आमदार वैभव नाईक यांची शिफारस तर ग्रा. प. सदस्य चंद्रकांत राऊळ यांच्या प्रयत्नांना यश
चौके ( अमोल गोसावी ) : काळसे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत ( पप्या ) राऊळ यांच्या प्रयत्नातून आणि कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशी नंतर आजपासून काळसे बादेवाडी येथे ” बादेवाडी जुने पोस्ट ऑफिस ” बस थांबा सुरू करण्यात आला. बादेवाडी येथील श्री. बाळकृष्ण मयेकर यांच्या हस्ते बस थांबा फलकास पुष्पहार घालून आणि श्रीफळ वाढवून या बस थांब्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत राऊळ , मोनिका म्हापणकर , शिवसेना शाखाप्रमुख राजू परब , उमेश प्रभु, निलेश राणे , महेश मयेकर , संतोष राऊळ , सतीश राणे , अण्णा आजगावकर , नंदकुमार मेस्त्री , पांडू मेस्त्री , यशवंत चव्हाण , पिंगुळकर , विजय राणे , सचिन मयेकर , सुनिल वरक , आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सदर बस थांब्याचा बादेवाडी , सुतारवाडी , राणेवाडी , गोसावीवाडी या वाडींमधील नागरीकांना फायदा होणार आहे. हा बस थांबा सुरू केल्याबद्दल आमदार वैभव नाईक आणि ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत राऊळ यांचे उपस्थित नागरीक आणि परीसरातील एस. टी. प्रवाशांना आभार व्यक्त केले.













