हेत येथील अपंग युवतीवर विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर कायदेशीर कारवाई

मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव राजेश्री नारकर- चांदूरकर यांच्या मागणीला यश

वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यातील हेत गावातील एका अपंग मुलीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून तीचा विनयभंग प्रकरणी आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव राजेश्री नारकर- चांदूरकर यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिले होते. हेत गावातील ग्रामपंचायतचे शिपाई खानविलकर हे गावातील त्यांच्या घरी वैद्यकीय शिबिराची सुचना घेऊन गेले होते त्यावेळी घरी कोणी नसल्याचे लक्षात येताच घरातील मुलीच्या अपंगत्वाचा गैर फायदा घेत मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केल्याप्रकरणी गावातील स्थानिक पातळीवर पिडित मुलीला सदर प्रकरणी सहकार्य मिळत नसुन उलट पैशाचे आमिष दाखवून पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करु नको उलट तुझे नुकसान होईल असे धमकावले सदर प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव राजेश्री नारकर-चांदूरकर यांच्याकडे तक्रार केली होती. सदर प्रकरणी चौकशी करून तात्काळ आरोपीवर व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव राजेश्री नारकर-चांदूरकर यांनी वैभववाडी पोलीस निरीक्षक यांचे कडे निवेदनाद्वारे केली होती त्यास यश आले असून आरोपीवर वैभववाडी पोलीस ठाण्यामार्फत कारवाई करण्यात आली आहे. समाजातील सर्व महिला वर्गाने न घाबरता आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पुढे आले पाहिजे मानवाधिकार असोसिएशनच्या वतीने त्यांना पुर्ण सहकार्य केले जाईल असे मत सचिव राजेश्री नारकर-चांदूरकर यांनी व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!