कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांचे चाहते आणि कार्यकर्त्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार नितेश राणेंना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा . आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा असे ट्विट केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिमंडळातील सहकारी, भाजपा आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे ट्विट केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आ.नितेश राणेंचे वाढदिनी अभिष्टचिंतन












