पडेल हायस्कुलमध्ये निरंजन दीक्षित यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप

देवगड (प्रतिनिधी): पडेल येथील श्रीराम माध्यमिक विदयामंदिर व कनिष्ठ महाविदयालय पडेल या हायस्कुल व महाविदयालयामधील गरजू विदयार्थ्यांना निरंजन दिक्षित यांनी आपले दिवंगत वडिल बाळासाहेब दिक्षित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. पडेल येथील श्रीराम माध्यमिक विदयामंदिर व कनिष्ठ महाविदयालय पडेल या हायस्कुल मधील गरजू विदयार्थ्यांना शैक्षणिक वाटप करतेवेळी निरंजन दिक्षित, शाळा समिती सदस्य, संजय घाडी,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विनायक चव्हाण,सुरेश देवळेकर,शाळेचे मुख्याध्यापक हिराचंद्र तानावडे,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना निरंजन दिक्षित म्हणाले की, पडेल गाव हे आपले मुळ गाव आहे. यामुळे वडिलांनी शैक्षणिक क्षेत्रामधील योगदान देण्यासाठी आम्हाला चालना दिली आहे. आणि त्याचाच वारसा पुढे घेऊन आपण शैक्षणिक व समाजकार्यामध्ये काम करीत आहोत. विदयार्थ्यांनी अभ्यासूवृत्ती आत्मसाद करुन सनदी अधिकारी बनण्याच्या दृष्टीकोनातून वाटचाल केली पाहिजे. या शाळेमध्ये ज्या गरीब गरजू विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वहया पाठयपुस्तके यांची कमतरता आपण कधीही भासू देणार नाही असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद पाटणकर तर सुत्रसंचालन रविराम माळगवे तर आभार संजीवनी फडके यांनी मानले.

error: Content is protected !!