कणकवली (प्रतिनिधी) : भरणी-तांबळवाडी येथील रहिवासी व मुंबई येथून सेवानिवृत्त झालेले पोस्टमन भार्गव महादेव जगताप (62) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सेवेनिमित्ताने ते मुंबई- घाटकोपर येथे वास्तव्यास असले तरी गावाच्या विकासासाठी योगदान देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भावजय, पुणते असा परिवार आहे. ते ग्रा.पं. सदस्य लक्ष्मी जगताप यांचे दीर तर भरणी सरपंच अनिल बागवे यांचे मामा होत.
भरणी येथील भार्गव जगताप यांचे निधन












