झाड कोसळून लोखंडी साकव मोडला

सातार्डेत 12 घरांचा संपर्क तुटला

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सातार्डा येथे झाड पडून लोखंडी साकव तुटल्यामुळे पलीकडे असणान्या बारा घरांचा संपर्क तुटला आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजता घडली. त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थी व कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नोकरदारांची गैरसोय झाली आहे. याबाबतची माहिती मिळताच त्या ठिकाणी महसूलचे पथक दाखल झाले. पंचनामा करण्यात आला आहे. संबंधित लोकांची पर्यायी सोय करण्यासंदर्भात प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबतची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.

error: Content is protected !!