परजिल्ह्यातील 3 महिलांसह एक स्थानिक अटकेत
एसपी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस आणि एलसीबी ची संयुक्त कारवाई
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील आजगाव येथे मागील काही दिवस सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर वेंगुर्ले पोलीस आणि एलसीबी पोलिसांनी आज धडक कारवाई करत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या परजिल्ह्यातील 3 महिलांसह जिल्ह्यातील एकाला अटक केली. एसपी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव, एलसीबी पोलीस निरीक्षक भोसले यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ले पोलीस आणि एलसीबी च्या पथकाने आज सायंकाळी छापा टाकत ही कारवाई केली. अड्ड्यावर आज वेंगुर्ला पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात 3 महिला आणि कुंटणखाना चालवणारा स्थानिक युवक अशा चौघांना पकडण्यात आले.त्या स्थानिक आरोपींकडून पुढील चौकशी करायची असल्याने त्याचे नाव पोलिसांकडून सांगण्यात आले नाही. त्या महिलांसह स्थानिक रहिवासी असलेल्या युवकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.












