कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ मालवण रोड, नेरूर दत्तनगर या मार्गावर भला मोठा खड्डा पडलेला आहे. गेले कित्येक दिवस हा खड्डा त्या ठिकाणाहून वाहतूक करणाऱ्यांना दिसत आहे. परंतु याची राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते कोणीच दाखल घेत नाहीत. या रोड वरून पर्यटकांची येजा सुरू असते. तरी देखील हा रस्ता एका खड्ड्यामुळे खराब बनलेला आहे. आणि या एका खड्ड्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी लवकरात लवकर राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी लवकर लक्ष घालून पडलेला खड्डा बुजवावा अशी विनंती, तेथील ग्रामस्थ करीत आहेत.













