शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचे टीकास्त्र
कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे हे स्टंटबाजी करण्यात माहिर असल्याचे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे.नितेश राणेंची याआधीच स्टंटबहाद्दूर म्हणून गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्र नोंद झाली आहे.तो पुरस्कार त्यांनी स्वीकारावा अशा शब्दांत शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी आमदार नितेश राणेंचा समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खोटे बोलण्याची नोंद गिनीज बुकात या टीकेला सतीश सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. औषध आपल्या दारी, एजी डोटर्स, वायफाय सारख्या बंद पडलेल्या 25 प्रकल्पाची घोषणा करून आमदार नितेश राणेंनी मते मिळवली.मात्र आता नितेश राणेंची स्टंट बहाद्दूर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकात नोंद झाली असल्याची टीका सावंत यांनी केली.












