अनंत पिळणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी दिले नियुक्तीपत्र

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस च्या पक्षसंघटनेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या अनंत पिळणकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी अनंत पिळणकर याना नियुक्तीपत्र दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी मंत्री प्रवीण भोसले आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अनंत पिळणकर यांनी उत्कृष्ट काम करत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली. पिळणकर यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्यावर आता कणकवली तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

error: Content is protected !!