डीपीडिसी मिटिंग म्हणजे शासकीय सोपस्कार

पालकमंत्र्यांच्या जिल्हा विकासाच्या केवळ थापा

मनसे सरचिटणीस उपरकर यांची टीका

कणकवली (प्रतिनिधी) : डीपीडिसी मिटिंग उशिराने होतात म्हणून बोंब मारणारे तत्कालीन विरोधी आमदार आज मात्र 6 महिन्यांनी झालेल्या डीपीडिसी मिटिंग वेळी मात्र मूग गिळून गप्प होते. केवळ डीपीडिसी मिटिंग पार पाडण्याचा सोपस्कार पालकमंत्री चव्हाण यांनी केला अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.डीपीडिसी मिटिंग जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारी असते.मात्र आमदारांचे अधिकारी ऐकत नाहीत ही शोकांतिका डीपीडिसी मिटिंग आमदारांनी मांडली.अधिकारी शुक्रवारी जे गायब होतात ते सोमवारी दुपारनंतर ऑफिसमध्ये येतात हे पुन्हा सिद्ध झाले.  क्लासवन अधिकाऱ्यांच्या हालचाली चे रजिस्टर ठेवण्याचा जीआर काढला होता.शासकीय अधिकाऱ्यांनी मुंबई ला ये जा करून शासकीय खर्च वाढविण्यापेक्षा व्हिडीओ कॉन्फरन्स ने मिटिंग घ्याव्यात हा शासकीय निर्णय पालकमंत्री चव्हाण यांना नसणे हे दुर्दैव आहे.पावसाळी डांबराने बुजविण्याच्या सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्या नाहीत. पावसाळ्यात सुरवातीलाच खड्डेमय रस्ते झाले आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवर आच्छादने करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री चव्हाण यांनी केली मात्र आजही पावसात रेल्वे प्रवासी प्लॅटफॉर्मवर भिजताना दिसतायत. रिक्त शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी नेमणुकीवर घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला. ज्यांना पेन्शन 30 ते 40 हजार आहेत त्यांना आणखी 20 हजार मिळतील याची सोय करताना जे डीएड बेरोजगार आहेत त्यांना मात्र एजबार झाले तरी नोकरी नाही. धोरनशून्य असा हा डी एड बेरोजगारांवर अन्यायकारक असा निर्णय शिक्षणमंत्री केसरकर यांचा असल्याची टीकाही उपरकर यांनी केली.

error: Content is protected !!