कुडाळ (अमोल गोसावी) : पिंगुळी समर्थनगर येथे एका इसमाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. याबाबत अधिक माहिती समोर आली असून सदर व्यक्ती हुमरमळा येथील सिद्धेश गाळवणकर (वय अंदाजे ३५) नामक असल्याचे समजते. या व्यक्तीच्या हातात औषधांची पिशवी आहे. प्राप्त माहितीनुसार, सिद्धेश हे आजारी असल्याने काल कुडाळमध्ये डॉक्टरकडे गेले होते. परंतु, काल ते रात्री घरी पोहोचले नाहीत. याबाबत त्यांचा नातेवाईकांकडून शोध सुरू होता. दरम्यान, आज सिद्धेश यांचा मृतदेह पिंगुळी समर्थनगर येथे आढळून आला. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परिवार आहे. सिद्धेश यांचा मृत्यू कसा झाला याबाबत कुडाळ पोलिस माहिती घेत आहेत.
पिंगुळीत सापडला इसमाचा मृतदेह.












