चिंचवली मधलीवाडी शाळेकडून मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा सत्कार..

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी शाळेला सातत्याने सहकार्य करत असल्यामुळे शाळेच्या माध्यमातून चिंचवली गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे-चिंचवलकर व त्यांच्या सहचारिणी शोभा कांबळे-चिंचवलकर या उभयतांचा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नम्रता कोलते अन् सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत भालेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका डाबेराव पवार, सह शिक्षक गोरखनाथ गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या साक्षी भालेकर,दर्शना गुरव अन् विद्यार्थी उपस्थित होते.

मिलिंद कांबळे चिंचवलकर यांनी बाळकृष्ण जाधव यांच्या वतीने तत्कालीन राज्यसभेचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर सरांच्या माध्यमातून शाळेचे कंपाऊंड व गेटसाठी पाच लाख रुपये खासदार निधी मिळवून दिला असून, शाळेला महापुरुषांचे २० फोटो, शाळेच्या डागडूजीसाठी १० हजार रुपये, ग्रीन बोर्डसाठी १,६५० रुपये, शाळेसाठी १२ लिटरचा कुकर, गॅस शेगडी, मिक्सर अन् भिस्ती चित्रासाठी मदत असे सहकार्य केले आहे. तसेच बालवाडीला स्टेशनरीसाठी कपाट देणार असून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजने अंतर्गत ते पाच मुलींना दत्तकही घेणार आहेत. त्यांच्या सहकार्याबद्दल शाळेच्या शिक्षकांनी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही यावेळी आभार व्यक्त करुन, सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत भालेकर यांनी त्यांच्या कार्याच कौतुक केले. मिलिंद कांबळे-चिंचवलकर यांनी आजतागायत अनेकांना मदतीचा हात दिला असून,अनेकांना मदतही मिळवून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!