आचरा (प्रतिनिधी) : जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे आयोजित सिंधु सर्च टॅलेंट परीक्षेत जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडीच्या इयत्ता तिसरीतील सर्वेश महेश कदम याने सिल्व्हर मेडल तर सुजन परेश चव्हाण याने ब्राँझ मेडल प्राप्त केले. दोन्हीही विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष महेश कदम, शाळा व्यवस्थापन कमिटी, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक निशिगंधा वझे व मैना कारंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सिंधु सर्च टॅलेंट परीक्षेत चिंदर भटवाडी शाळेचा सर्वेश कदम सिल्व्हर मेडल तर सुजन चव्हाण ब्राँझ पदकाचा मानकरी…!











