कुडाळ (प्रतिनिधी) : माजी खासदार निलेश राणे हे विरोधकांवर टीका करताना असंसदीय आणि शिवराळ भाषेत पातळी सोडून बोलत असतात. माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवराळ भाषेत टीका केली आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज कुडाळ पोलीस स्थानकात पीएसआय श्री.पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कुडाळ नगरपंचायत च्या बांधकाम सभापती श्रेया गवंडे, माजी नगरसेविका मेघा सुकी, नगरसेविका श्रुती वर्दम, सई काळप, ज्योती जळवी आणि युवती सेना शहरप्रमुख तेजस्वी परब आदी उपस्थित होत्या.