कुडाळमध्ये विद्युत पोलवर काम करत असताना शॉक लागून वायरमन गंभीर

कुडाळ (अमोल गोसावी) : आज सकाळी साडेदहाच्या दरम्यान कुडाळ शहरातील गवळदेव जवळील अभिमन्यू हॉटेल समोरील विजवितरण कंपनीच्या पोलवर काम करीत असताना विजवितरण कंपनीचा कर्मचारी धंनजय फाले ( सध्या रा. पिंगुळी शेटकरवाडी मुळ रा. महादेवाचे केरवडे) हा विजेचा तीव्र धक्का लागून पोलवरच चिकटून राहीला. त्यानंतर तातडीने वीज पूरवठा बंद करण्यात आला आणि विजवितरणचे कर्मचारी, एम.आय.डी.सी. अग्नीशमन दल व नागरीकांच्या मदतीने पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर त्याला पोलवरुन सुरक्षित खाली उतरविण्यात आले. तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे नेण्यात आले.

या अपघातात वायरमन धनंजय फाले हा गंभीर जखमी झाला आहे व दुर्दैवीरित्या भाजलाही आहे . यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरीकांनी गर्दी केली होती. विजवितरणकडे कोणतीही आपत्कालीन व्यवस्था नसल्याने वायरमन फाले यांच्यावर पाऊण तास पोलवर लोंबकळत राहीले.

error: Content is protected !!