कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ तालुक्यातील माणगाव डोंगरवाडी येथील रहिवासी रत्नप्रभा कृष्णा गुडेकर यांच्या राहत्या घराची मातीची भिंत मुसळधार पावसाने काल गुरुवार दिनांक २० जुलै रोजी कोसळली. यामध्ये गुडेकर कुटुंबियांचे हजारो रुपयांची नुकसान झाले आहे दरम्यान माजी सरपंच सचिन धुरी व तलाठी श्री. शेणवी यांनी नुकसानीचा पंचनामा केला. रत्नप्रभा गुडेकर या घरात एकट्याच रहात असुन घर जमीनदोस्त होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी संबंधित प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे.
अतिवृष्टीमुळे माणगाव डोंगरवाडी येथे राहत्या घराची भिंत कोसळली












