घटनास्थळी पहाणी करत निलेश राणेंकडून वालावल बंगेवाडी ग्रामस्थांना अर्थसहाय्य
कुडाळ (अमोल गोसावी) : गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल कुडाळ तालुक्यातील वालावल बंगेवाडी येथे भूस्खलन होऊन घरांना धोका निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी त्वरित वालावल गावाशी संपर्क करून धोकादायक स्थितीत असलेल्या घरांतील स्थानिकांच्या स्थलांतराच्या सूचना दिल्या व आज वालावल बंगेवाडी येथे उपस्थित राहून सदरील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित तलाठी व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्थानिकांना आवश्यक सहकार्याच्या सूचना देत स्थलांतरानंतर त्यांच्या पुढील व्यवस्थेसाठी निलेश राणे यांनी ५० हजाराची आर्थिक मदत ग्रामस्थांजवळ सुपूर्द केली. यावेळी कुडाळ तालुका भारतिय जनता पक्षाचे पदाधिकारी व वालावल येथील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.












