सागरी महामार्ग देवली येथे खचला वाहतूक बंद

मालवण सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांचा निर्णय ; दुरुस्ती काम सुरू

चौके (अमोल गोसावी) : सागरी महामार्ग कुंभारमाठ देवली हा मुसळधार पावसात देवली येथे खचला आहे. वाहतुकीस धोका निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांनी शुक्रवारी हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे.

दरम्यान, बांधकाम विभागाकडून दुरुस्ती काम चालू आहे. वाहतूक बंद ठेवून अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. तरी वाहनचालक व नागरिक यांनी याची नोंद घ्यावी. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी कुंभारमाठ ते देवली शासकीय तंत्रनिकेतन येथून देवली सागरीमहामार्ग जोडरस्ता असा प्रवास करावा. असे आवाहन मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!