कोल्हापूर – सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील गगनबावडा मार्गे हलकी वाहतूक अखेर सुरु

गगनबावडा येथील मांडुकली येथील राज्य महामार्गावरील पाणी ओसरले

बालींगा पुलावर अद्याप अवजड वाहनांना प्रवेश बंदी

वैभववाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली मधील महामार्गावर पाणी आल्याने सिंधुदुर्ग व कोल्हापूर मार्ग होणारी वाहतूक ठप्प झाली होती. तसेच अवजड वाहने वगळून सुरक्षितता बाळगत हलक्या वाहनासह दुचाकीना पुलावरून वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा दिला मिळाला.कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदीपात्रातील पाणी झपाट्याने वाढले. नदीची पाणीपातळी बालिंगा पुलाच्या स्प्रींज लेवलला पोहोचल्याने खबरदारी म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच गगनबावडा येथील मांडुकली जवळ महामार्गावरील पाणी ओसरल्याने कोल्हापूर – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहतूक पुर्ववत झाली आहे. मात्र बालींगा पुलावर अद्याप अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली आहे.

error: Content is protected !!