कणकवली(प्रतिनिधी) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यालयाकडून प्रधान सचिव याना 3 फेब्रुवारी 2023 रोजी द्वारे दिव्यांगाना सर्व प्रकार च्या गाड्या मोडीफाय न करता खरेदी केल्यानंतर त्यांनी चालक ठेवला असेल तर त्यांना जीएसटी माफी देण्याबाबत चा आदेश काढला आहे.तसेच त्यांनी 20 नं चा फॉर्म भरल्यानंतर देशात त्यांना टोलमाफी मिळते.याबाबत मनसे शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग एआरटीओ ना केंद्र सरकारचा जीआर दाखवल्यानंतर याबाबत ची कार्यवाही सुरू केली आहे.केवळ नवीन नव्हे तर जुनी गाडी खरेदी केल्यानंतर ही तरतुद असून याचा लाभ दिव्यांग बांधवांनी घ्यावा असे आवाहन मनसे सरचिटणीस उपरकर यांनी केले आहे.












