रोटरी क्लब वैभववाडीची कार्यपद्धती ऐकून होतो परंतु गेल्या वर्षभरातले काम पाहून मी भारावून गेलो.-माजी सभापती बाप्पी मांजरेकर यांचे उद्गार

रोटरी क्लब वैभववाडी यांच्या वतीने नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी प्राथमिक शाळेतील छत्री वाटप कार्यक्रम संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने विद्या मंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवाडी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती बाप्पीसाहेब मांजरेकर, सरपंच सौ सुतार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर हे लाभले होते. चार्टर्ड प्रेसिडेंट श्री संतोष टक्के यांनी रोटरी म्हणजे काय आणि रोटरीची कर्तव्य आणि कार्यपद्धती याविषयीची माहिती उपस्थितांना दिली. सचिव रो. प्रशांत गुळेकर यांनी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे कामकाज व केलेले कार्य उपस्थितांना विशद केले. रो. व उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनीही वैभववाडी रोटरी क्लबच्या कामकाजाचा आढावा दिला. यावेळी छत्री वाटपासाठी आपल्या प्रशाळेतील विद्यार्थ्यची निवड केल्याबद्दल रोटरी क्लब चे आभार मुख्याध्यापक श्री पातडे सर यांनी मानले. रोटरीच्या मार्गदर्शक सूचनानुसार वैभववाडी रोटरी क्लबचे काम सुरू आहे, गेल्या दीड वर्षात केलेल्या कामाचं कौतुक झाल्यामुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. माझ्या प्रेसिडेंट पदाच्या वर्षभराच्या कालावधीत मी समाजभिमुख व रोटरीला अपेक्षित कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगून या प्रशालेणे छत्री वाटपासाठी संधी आपल्याला दिल्याबद्दल आभार मानले आणि या शाळेचा इतिहास ऐकून आपण भारावून गेल्याचे प्रेसिडेंट संजय रावराणे यांनी सांगितले . या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब वैभववाडीचे रो.डॉक्टर नामदेव गवळी , श्री मिस्त्री सर, तेजस आंबेकर ,सूर्यकांत पाटील,सूर्यकांत पाटील सौ पूजा सावंत सौ खांबल सौ श्रेया धावले सौ सलोनी टक्के आदी रोटरीयन्स,ग्रामस्थ,व विध्यर्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!