खांबाळे टेंबवाडी अंगणवाडी इमारतीचे सरपंच गौरी पवार यांच्या हस्ते उद्घाटन

खासदार विनायक राऊत यांनी डोंगरी विकास निधी +मधून दिला होता निधी

वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे टेंबवाडी अंगणवाडी इमारतीसाठी जागा नसल्याने अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत नव्हती. प्रसंगी अंगणवाडी खाजगी जागेत चालवावी लागत होती. अंगणवाडी मंजूर होवून एखादी हक्काची इमारत असावी अशी गावातील ग्रामस्थांची मागणी होती. परंतू जागे अभावी ही अंगणवाडी मंजूर होण्यासाठी अडचण निर्माण होत होती. अखेर उपसरपंच गणेश पवार यांनी अंगणवाडी इमारतीच्या जागेसाठी प्रयत्न करून आपले आजोबा कै. महादेव गणपत पवार यांच्या स्मरणार्थ 2 गुंठे जागा विनामूल्य बक्षीसपत्र करून दिली.

सदर अंगणवाडी इमारत मंजूर होण्यासाठी खांबाळे गावचे सुपुत्र शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून डोंगरी विकास कार्यक्रम सन 2021-2022 मधुन या कामासाठी साडे बारा लाखाचा भरीव निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे खांबाळे गावात सर्व सोईसुविधांसह सुसज्ज अंगणवाडी इमारत उभी राहिली. या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन खांबाळे सरपंच गौरी पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके,उपसरपंच गणेश पवार,सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड,बाल विकास प्रकल्प अधिकारी (प्रभारी मनस्वी मंगेश कांबळे,पर्यवेक्षिका मधुरा मांजरेकर,ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता कदम,मंगेश गुरव, दर्शना मोरे,माजी सरपंच विठोबा सुतार,सोसायटीचे माजी चेअरमन दीपक चव्हाण,सुनिल पवार,जेष्ठ ग्रामस्थ अशोक पवार,मंगेश कदम,प्रमोद लोके,महादेव पवार,शांताराम कदम,गणेश सदाशिव पवार,मंगेश कांबळे,रमेश चव्हाण,विलास प्रभु,विलास मोहिते,राजेंद्र देसाई,दीपक महादेव पवार,मंगेश सूद,प्रशांत गुरव,अंबाजी पवार,नंदू पवार,जयेश पवार,अंगणवाडी सेविका धनश्री देसाई,पुजा गुरव,पूजा पवार,आशा स्वयंसेविका शामली देसाई,मदतनीस समीक्षा पवार,अंगणवाडीतील मुलांचे पालक प्रमोदिनी पवार,आर्या पवार,निलम कांबळे,दिप्ती कांबळे,पूजा प्रथमेश पवार,ॠतूजा धूरी,अंकिता पवार,श्वेता जाधव आदी ग्रामस्थ व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!