सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू ; गुरांसाठी चारा कापत असताना घडली दुर्घटना

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गुरांसाठी चारा कापण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकन्याता नागाने दंश केलने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास सांगेली- काजरमळा येथे घडली. राजेश पुंडलिक रेमुळकर (वय ४८) असे त्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. रेमुळकर हे आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या बाजूला असलेल्या शेतात गुरांसाठी चारा कापण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक त्यांना नागाने दंश केला. त्यामुळे ते ओरडते. त्यांचा आवाज ऐकून घरातील व्यक्ती त्या ठिकाणी गेले. तोपर्यंत ते बेशुद्ध पडलेते होते. अशा परिस्थितीत त्यांना गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊत यांच्यासह पोलीस पाटील विठ्ठत डोईफोडे आदींनी सावंतवाडी कुटीर तात अधिक उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याची माहिती मिळतात माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँकेचे सदस्य रवींद्र मडगावकर, माजी अध्यक्ष गजानन गावडे आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली. श्री. रेमुळकर हे शेतकरी होते. त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या पक्षात पत्नी, दोन मु असा परिवार आहे.

error: Content is protected !!