आंबडोस गावचे सुपुत्र वासुदेव वरवडेकर यांची पोलिस दलात उपनिरीक्षकपदी बढती

चौके ( अमोल गोसावी ) : सिंधुंदुर्ग पोलिस दलात गेली ३२ वर्षे प्रामाणिकपणे कर्तव्यदक्ष सेवा बजावणारे मालवण तालुक्यातील आंबडोस गावातील सुपुत्र वासुदेव वरवडेकर याना नुकतीच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. वासुदेव वरवडेकर यांचे अकोला येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिनांक १७/१२/१९९१ रोजी पोलीस सेवेत पोलीस नाईक म्हणून रुजू झाले. त्यानंतर पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. या ३२ वर्षाच्या सेवाकाळात सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ले, जिल्हा मुख्यालय, बाँम्ब पथक याठिकाणी प्रामाणिकपणे कर्तव्यदक्ष सेवा बजावत कार्यरत आहेत. सिंधुंदूर्ग जिल्हा पोलिसदलाच्यावतीने जवळपास २२ वर्षे बास्केट बॉल आणि ॲथलेटीक्स या खेळातून जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करुन पोलीस दलाला अनेक पारितोषिके मिळवून दिली. पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधिक्षक यांनी २५० च्या आसपास बक्षिस (रिवार्ड) देऊन गौरवीत केले आहे. वासुदेव वरवडेकर यांना पोलीस सेवेतील कालावधीत चांगल्या सेवेबद्दल पोलीस महासंचालक “पदक” देऊन सन्मानित करण्यात आले होते. ३२ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेत पोलिस नाईक, पोलिस हवालदार वा आता सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (ASI असिस्टन सब इन्स्पेक्टर ) म्हणून दिनांक ०१/०८/२०२३ रोजी बदती मिळाली. वासुदेव वरवडेकर याना प्रामाणिक सेवेतून मिळालेल्या बदतीबद्दल आंबडोस गावासह चौके पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!