देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील विठ्ठलादेवी फणसगावचे सुपुत्र शशिकांत शांताराम नारकर यांना सैन्यदलात सुभेदार मेजरपदी बढती मिळाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी मेजर शशिकांत याना रेजिमेंट कमांडर यांच्या हस्ते खांद्यावर अशोकस्तंभ लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. मेजर शशिकांत हे माजी जि प सदस्य प्रदीप नारकर यांचे sakkhe चुलत भाऊ आहेत. सैन्यदलात सुभेदार मेजरपदी बढती मिळाल्याबद्दल शशिकांत नारकर यांचे फणसगाव वासीय तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.