देवगड – मळई खाडीकिनारी अज्ञात महिलेचा मृतदेह

देवगड (प्रतिनिधी) : मळई खाडीकिनारी ४५ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. सकाळी अकराच्या सुमारास हा मृतदेह नदीतून खाडीच्या दिशेने वाहून आला असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याबाबत माहिती तेथील माजी नगरसेवक उमेश कनेरकर यांनी देवगड पोलिसांना दिली.अधिक तपास देवगड पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!