भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ” आजादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

तालुक्यातील कार्यकारणी बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व देशवासीय एक भारत श्रेष्ठ भारताचा संकल्प आणि नवीन भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पुर्णपणे कटिबद्ध आहेत . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रम आणि संकल्प करुन साजरा करावा असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी तालुका बैठकीत केले. दिनांक ९ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपले जिवन समर्पित करणाऱ्यांचे स्मरण करण्यासाठी तसेच स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या अशा शुर विरांना नमन करण्यासाठी प्रदेश भाजपाने विविध कार्यक्रम दिले आहेत . या कार्यक्रमाची बुथ स्तरापर्यंत माहीती व्हावी यासाठी तालुका कार्यकारणी , शक्तीकेंद्र प्रमुख ,बुथ प्रमुख ,सरपंच , उपसरपंच यांची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती .

मेरी मिट्टी मेरा देश
स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या अशा शुर विरांना जन्म देणारी आपली भारतमाता खरच महान आहे . अशा महान भुमीत आपण जन्मलो हे आपले भाग्यच आहे . या भारत मातेसाठी माती हातात घेऊन देशासाठी स्वताला समर्पित करण्याची शपथ घेऊन शिला फलकाचे समर्पण , पंचप्राण शपथ , वसुधा वंदन , वीरोंको वंदन असे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले . तसेच शहरी व ग्रामीण भागात ” मिट्टी यात्रा ” काढली जाणार आहे .

१४ ऑगस्ट — ” विभाजन विभिषिका स्मृती दिवस “
देशाच्या फाळणीच्या वेळी ज्यांनी प्राण गमवले त्या सर्वांना ” फाळणी विभिषिका दिना निमित्त ” श्रद्धांजली वहाण्यात येणार आहे .फाळणित विस्थापित झालेल्या आणि प्राण गमावलेल्या आपल्या लाखो बंधु – भगिनींच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ १४ ऑगस्ट हा ” विभाजन विभिषिका स्मृर्ती दिवस ” म्हणुन साजरा करण्यात येणार आहे . या दिवशी मुक मिरवणूक काढून त्या मिरवणुकीचा समारोप स्वातंत्र्य सेनानी , क्रांतिवीर , हुतात्मा चौक अशा ठिकाणी करण्यात येणार आहे .

हर घर तिरंगा
दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ” हर घर तिरंगा ” कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे . ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या कालावधीत देशभक्तीपर गीत , तिरंगा यात्रा , मेळावे आयोजित करून देशभक्तीचा प्रचार व वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे .११ ते १३ ऑगस्ट या कालावधीत ” रघुपती राघव राजाराम ” भजन व ” वंदे मातरम ” गीत लाऊन प्रभात फेरी काढली जाणार आहे .१५ ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकावला जाणार आहे . अशा पद्धतीने शहरी व ग्रामीण भागात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले .

यावेळी तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा चिटणीस अँड.सुषमा खानोलकर , महीला मोर्चा अध्यक्षा स्मीता दामले , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक – वसंत तांडेल – बाळा सावंत , खरेदि विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , महीला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर ,नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका साक्षी पेडणेकर , ता.चिटणीस नितिन चव्हाण – जयंत मोंडकर – समीर कुडाळकर – सुजाता देसाई , शक्तीकेंद्र प्रमुख विजय बागकर – संतोष शेटकर – कमलेश गावडे – सुधीर गावडे – ताता मेस्त्री – विजय बोवलेकर , किसान मोर्चाचे बाळु प्रभु , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , पाल सरपंच कावेरी गावडे , वेतोरे सरपंच प्राची नाईक , वेतोरे उपसरपंच संतोषी सु. गावडे , कुशेवाडा सरपंच निलेश सामंत , पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील , परबवाडा सरपंच शमिका बांदेकर , आरवली सरपंच तातोबा कुडव , होडावडा उपसरपंच राजबा सावंत , माजी सरपंच विजय रेडकर , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर – रसिका मठकर – आकांक्षा परब , बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ – विनय गोरे , प्रथमेश सावंत , साळगावकर ईत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!