कणकवली (प्रतिनिधी) : स्मिता केशव प्रभू (वय 64 वर्षे) यांचे पुणे तळेगाव दाभाडे येथे निधन झाले. त्या अनेक वर्ष वेंगुले तालुक्यातील मातोंड येथे आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. चाकण येथील महेंद्र कंपनीचे मॅनेजर सिद्धेश यांच्या त्या आई तर सेवाधाम मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथील सिनीअर नर्स सिद्धी यांच्या त्या सासुबाई होत. पत्रकार अमोल शेणई आणि आडेली पोस्टमास्तर विकास शेणई यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत.












