आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स (एम.एस.एफ.सी.) निदेशक संघटनेची कार्यकारणी सभा रवळनाथ मंदिर सभागृह ओरस, येथे संपन्न झाली. या सभेला मालवण, कणकवली, सावंतवाडी, तालुक्यातील सर्व शाळेमधील एम.एस.एफ.सी. विषय शिकवणारे निदेशक उपस्थित होते. नववी ते दहावी इयत्ता पर्यंत हा अभ्यासक्रम शिकवीला जातो या निदेशकांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारणी ठरवण्यात आली.
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा एम.एस.एफ.सी. विषय निदेशक संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडियम स्कूल बांदा अभियांत्रिकी विभागाचे निदेशक श्री. राकेश परब यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण हायस्कूल, ऊर्जा पर्यावरण विभागाचे निदेशक श्री. केशव भोगले यांची निवड करण्यात आली. सचिवपदी शंकर महादेवन विद्यालय कुंभवडे अभियांत्रिकी विभागाचे निदेशक श्री. विनायक दळवी यांची निवड आली.तर खजिनदारपदी श्री शांतादुर्गा हायस्कूल वडाचा पाट, मालवण येथील अभियांत्रिकी विभागाचे निदेशक श्री. जगन्नाथ आंगणे यांची निवड करण्यात आली. कार्यकारणी सदस्य सौ. रिया देसाई, श्री. भूषण सावंत, सौ.गायत्री देसाई, कुमारी कविता माडीये, सौ. नेहा गवंडे, कु. हर्षदा पाटकर, दर्शना मयेकर, तुळशीदास पावसकर यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील या विषयातील शिकवणा-या निदेशकांच्या समस्या सोडवण्यासाठी या संघटने मार्फत प्रयत्न करण्यात येणार आहे.