स्फूर्तिदायक उपक्रमांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सांगता सोहळा संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” या अभियान अंतर्गत वरवडे गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा पार पडला.यानिमित्ताने वरवडे ग्रामपंचायत येथे निवृत्त माजी सैनिक सुहास विचारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच गावातील माजी सैनिकांचा सन्मान सरपंच करुणा घाडीगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.ग्रामपंचायत परिसरात वृक्ष लागवड सरपंच करुणा घाडीगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान अंतर्गत वरवडे ग्रामपंचायत येथे शिला फलकाचे अनावरण माजी सैनिक श्री.कसबले यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी हातात दिवे घेवून पंच प्रण शपथ घेतली. माझी वसुंधरा,राष्ट्रगीत ,राज्य गीत,विजयी गीत गाण्यात आले.देशातील जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावलेल्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देवून सरपंच करुणा घाडीगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच करुणा घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप कदम,प्रदिप घाडी,विशाल कासले,मानसी तेली,अंकिता घाडीगांवकर, नूरजहान खोत,ग्रामसेवक पावसकर,माजी सरपंच इब्राहिम शेख,कान्हा मालंडकर, अचित कदम,माजी उपसरपंच आनंद घाडी,सुभाष मालंडकर सागर राणे,संदीप घाडी, अमोल घाडी,आदींसह ग्रामस्थ, गावातील प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक,कर्मचारी ,आशा व अंगणवाड़ी सेविका उपस्थित होते.














