76 व्या स्वातंत्र्यदिनी हर घर चंदन का पेड उपक्रम संपन्न
पडेल ग्रा पं च्या वतीने सामाजिक उपक्रमांसह भव्यदिव्य कार्यक्रमांनी साजरा झाला मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देवगड तालुक्यातील पडेल गावचे सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून हर घर चंदन का पेड ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. 76 व्या स्वातंत्र्यदिनी पडेल गावातील प्रत्येक घरासाठी 1 चंदन वृक्ष रोप वाटप करण्यात आले. पडेल गावातील 1 हजार घरांत 1 हजार चंदन वृक्षरोपटे वाटप करून चंदन झाडांचे पडेल गाव ह्या संकल्पनेची मुहूर्तमेढ 15 ऑगस्ट रोजी रोवण्यात आली. 1 हजार चंदन झाडांसह 500 अन्य झाडांचेही वाटप यावेळी करण्यात आले. यासाठी कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर, देवगड वनपाल सारीक फकीर, वनरक्षक कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभल्याची माहिती सरपंच भूषण पोकळे यांनी दिली. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सांगता सोहळ्यानिमित्त देवगड तालुक्यातील पडेल ग्रा पं येथे मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.13 ऑगस्ट रोजी पडेल ग्रा पं चे लिपिक, शिपाई, नळपाणीपुरवठा कामगार, स्वच्छक यांच्या हस्ते ध्वजारोहण रोहण करण्यात आले.तर 14 ऑगस्ट रोजी उपसरपंच विश्वनाथ तावडे आणि सर्व 10 ग्रा पं सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर 76 व्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी गावातील 29 दिव्यांग ग्रामस्थांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. शासन निर्देशानुसार माझी वसुंधरा आणि अमृतवाटिका उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात 75 झाडांचे वृक्षवाटप करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र पडेल गावात चंदनाच्या 1 हजार झाडांसह एकूण दीड हजार वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या 1 हजार चंदन झाडांची नोंद शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंद केली जाणार असल्याची माहिती तलाठी परुळेकर, मंडळ अधिकारी कडुलकर यांनी दिली. सातबारावर चंदन झाडाची नोंद झाल्यामुळे साहजिकच सातबारा धारक शेतकऱ्याला चंदन झाडाची जरी चोरी झाली तरी शासनाकडून आर्थिक नुकसानभरपाई मिळू शकेल. खुल्या बाजारात चंदनाला लाखोंचा भाव आहे.त्यामुळे आज ग्रा पं च्या वतीने दिलेले चंदन वृक्षरोप हे त्या शेतकऱ्याची भविष्यातील आर्थिक बाजू सक्षम करणारे साधन बनेल असा विश्वास यावेळी सरपंच भूषण पोकळे यांनी व्यक्त केला. 15 ऑगस्ट रोजी सार्वजनिक स्मशानभूमीसाठी स्वमालकीची 8 गुंठे जागा विनामोबदला ग्रामपंचायत ला दिल्याबद्दल जमीनमालक ग्रामस्थ विनायक यशवंत देवधर यांचा विशेष सत्कार पडेल ग्रा पं च्या वतीने करण्यात आला. मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत शिलाफलकाचे उदघाटन सरपंच भूषण पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक दयानंद कांबळे,सिद्धेश पाटणकर, प्रभाकर वाडेकर,सौ.शरयु अनुभवणे, अदिती तानवडे, अर्पिता पाटणकर, सानिका तनावडे, प्रतीक्षा माळगवे, जयदीप वारीक,समीर हेमले, सायली वारीक, माजी सरपंच विकास दीक्षित सर, विनायक देवधर, मंडळ अधिकारी कडुलकर , तलाठी परुळेकर, कृषी अधिकारी राठोड, केंद्रप्रमुख अशोक जाधव,पोलीसपाटील निनाद पाटणकर, मुख्याध्यापक पाळेकर मॅडम,मुख्याध्यापक हिराचंद तानवडे,तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत तानावडे, संतोष मशिये,संजय वारीक विनायक चव्हाण, प्रसाद पाटणकर,बी एन पाटणकर, भूषण बोडस,माजी सरपंच संजय मुळंम,माजी सरपंच अंकुश ठुकरल, बबन पडेलकर, केशव मुळंम, सुभाष घाडी, कांशीराम वारीक, दत्ताराम वारीक,संजय गावकर,अंगणवाडी सेविका स्नेहल घाडी, बचतगट ,सीआरपी कार्तिकी माळगवे, अनिशा वारीक,गावातील सर्व ग्रामस्थ सर्व शिक्षक ,विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.