खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दी.२९ आगस्ट २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता संस्थेच्या सभगृहात संस्थेचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव कृष्णा कर्ले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खालील विषयावर चर्चा होणार आहे. १) सभेची नोटीस वाचन करणे २)मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. ३)दी.३१ मार्च २०२३ अखेर पूर्ण झालेल्या वर्षाच्या संचालक मंडळाने तयार केलेल्या कामकाजाचा अहवाल,तेरिज,ताळेबंद,नफा – तोटा पत्रके स्वीकारणे ४)संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा वाटनीस मंजुरी देणे ५) सन २०२२- २३ सालच्या अंदाज पत्रकानुसार जादा झालेल्या झालेल्या खर्चाला मान्यता देणे व सन २०२३ – २४ सालाकरीता अंदाज पत्रक मंजूर करणे ६) सन २०२३ – २४ साला करीता बाहेरील कर्जाची मर्यादा ठरविणे ७)दी.२/४/२०२२ ते दी. ३१/३/२०२३ अखेर झालेल्या शासकीय हिशेब तपासणी अहवालाची नोंद घेणे व प्रतिवृत्तास मंजुरी घेणे.८) कमिटी सदस्य व नातलग यांना दिलेल्या कर्जाची यादी सादर करणे ९) सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखा परिक्षणासाठी शासकीय प्रमाणित लेखापरीक्षकाची नेमणूक करणे १०) पोटनियम दुरस्ती करणे बाबत विचार करणे ११)मा.अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे. तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित रहावे.असे आवाहन संस्थेचे चेअरमन रवींद्र जठार यांनी केले आहे.
खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटीची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २९ आगस्ट २०२३ रोजी











