अणाव येथील ‘आंनदाश्रय’ आश्रम येथे “मेरी माटी, मेरा देश” उपक्रमांतर्गत पोलीस ठाणेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीतील अणाव येथील आंनदाश्रय आश्रम येथे २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी “मेरी माटी, मेरा देश” उपक्रमांतर्गत पोलीस ठाणेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरीकांकरीता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त त्याचप्रमाणे चांद्रयानाचे यशस्वी लॅण्डींगबाबत शुभेच्छा देत मिठाईचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे दामीन पथकाचे माध्यमातुन महिलांविषयक कायदे या विषयी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे आस्थेने विचारपुस करुन संवाद साधुन संस्था चालक व आश्रमातील वयोवृध्द नागरीकांच्या समस्या जाणुन घेऊन पोलीस विभाग त्यांचे मदतीसाठी सदैव तत्पर असल्याबाबत माहिती देऊन आधार देण्यात आला. यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर, दामीन पथकाचे अंमलदार अश्विनी भोसले, शीतल नांदोसकर, प्रथमेश ओरोसकर तसेच आश्रमचे संचालक बबन परब, आश्रमातील जेष्ठ नागरीक वयोवृद्ध २० महिला व १५ पुरुष असे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!