वैभववाडी (प्रतिनिधी): कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, सांगूळवाडी येथील उत्तीर्ण विद्यार्थ्याना विविध नामांकित कंपनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी अक्षय कैलास घाडगे या विद्यार्थ्याची Tata Consultancy Service (TCS Elevate Wings1-Digital) या कंपनी मध्ये System Engineer या पदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्याला वार्षिक वेतन रु 8.0 लाख इतके आहे. महाविद्यायलाने प्लेसमेंटचा चढता आलेख कायम राखला आहे. प्लेसमेंट निकषांमध्ये मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, M.I.T.R.A Agro Equipment pvt. Ltd , कोठारी, सिद्धिविनायक प्री कूलिंग अँड कोल्ड स्टोरेज, एच . डी . एफ. सी. बँक , एच, बी. डी. फायनान्स, नेटाफीम इरीगेशन इंडिया , जीओ ग्लोबल या कंपन्यांचा समावेश आहे. मागील पाचही वर्षांत 100% विद्यार्थ्याना नोकरीच्या संधी निर्माण करून देण्यामध्ये महाविद्यालय यशस्वी ठरले आहे. व्यासंगी विचारवृत्ती,चौकसपणा अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि जिंकण्याची वृत्ती या गोष्टी आत्मसात केल्याने जीवन सफल होते असे विचार संचालक संदीप पाटील सर यांनी व्यक्त करत समाधान व्यक्त केले. यामध्ये महाविद्यालयाचे संचालक संदीप पाटील , सचिव सुधाकर येवले, प्राचार्य चेतन वाडेकर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. कृषि क्षेत्रातील कृषि अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय एक उत्तम पर्याय ठरत आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटच्या दृष्टीने परिश्रम घेतले जातात. ह्यामध्ये मुख्यत्वे विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी, त्यासाठी लागणारी पात्रता ह्या गोष्टींची ओळख तसेच ह्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आवश्यक असलेली बौद्धिक, तांत्रिक कौशल्ये, संभाषण कौशल्ये, ह्यावर नियमितपणे मार्गदर्शन केले जाते.
कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्लेसमेंटमध्ये घवघवीत यश












