अबब… आरोग्य केद्रांत आढळला कोब्रा जातीचा साप

भक्ष्याच्या शोधात साप आला चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात

सर्पमित्र अनंत बांबर्डेकर यांनी पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात

चौके (अमोल गोसावी) : चौके प्राथमिक आरोग्य केद्रांत रविवारी रात्री ड्यूटी वर असलेले परिचर श्री. संतोष चव्हाण यांना रात्री ८ वाजता साफसफाई करत असताना चौके प्रा. आरोग्य केंद्रातील कॉरिडॉर मध्ये साप दिसला. त्यांनी बाजूच्या इमारतीत असलेल्या डॉ. प्रवण पोळ व इतर कर्मचारी यांना याबाबत कल्पना दिली. इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा या प्रजातीचा हा साप असल्याचे समजताच वैद्यकीय अधिकारी डॉ प्रणव पोळ यांनी तात्काळ मालवण – वायरी येथील सर्पमित्र श्री. अनंत बांबर्डेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सर्पमित्र श्री. अनंत बांबर्डेकर यांनी तातडीने चौके आरोग्य केद्रांत येत हाँलमधील लादीत लपून राहिलेल्या कोब्राला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, मुख्यालयीन परिचारिका श्रीम. मराळ, परिचर श्री. चव्हाण हे उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!