भाजपा कार्यकर्ते आक्रमक ; पोलीस ठाण्यात धाव
कणकवली (प्रतिनिधी) : पाकिस्तान चा स्वातंत्र्यदिन 14 ऑगस्ट रोजी जल्लोषात साजरा करण्याची आवाहन पोस्ट सोशल मीडियावर ठेवण्याचा प्रकार कणकवली तालुक्यातील एका गावात घडल्याचे वृत्त आहे. यावरून भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. भारतीय नागरिक असूनही पाकिस्तान चे गोडवे गाणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपा कार्यकर्ते करत आहेत.











