कणकवली स्थानिक व्यापारी संघ आयोजित महासेलमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
कोल्हापूर गांधीनगर पेक्षाही स्वस्त किंमतीत दर्जेदार खरेदीचा आनंद
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली स्थानिक व्यापारी संघ आयोजित महासेल ला उदघाटना च्या पूर्वसंध्येलाच ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. तेली आळी तील जुन्या एलआयसी ऑफिस इमारतीत खरेदीसाठी आज सायंकाळी शेकडो ग्राहकांनी गर्दी केली होती. उद्या 31 ऑगस्ट रोजी सकाळी या महासेल चे उदघाटन होणार आहे.मात्र कोल्हापूर गांधीनगर पेक्षाही स्वस्त असलेल्या या सेल मध्ये त्याआधीच ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली .गणेश चतुर्थी सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांचा फायदा हाच आमचा फायदा मानून कणकवली स्थानिक कापड व्यापारी संघाने महासेल आयोजित केला असून 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान जुने एलआयसी ऑफिस इमारत, तेली आळी कणकवली येथे सकाळी 10 ते रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान हा सेल सुरू राहणार आहे. सेल चा माल मस्त अगदी स्वस्ताहूनही स्वस्त या धमाकेदार ऑफर सह ग्राहकांना मनपसंत आणि दर्जेदार खरेदीचा आनंद घेता येणार आहे. बाईपण भारी देवा फेम साडी अगदी 180 आणि 500 रुपयांना उपलब्ध असणार आहे. 130 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत साडीच्या हजारो व्हरायटी,मंगळसूत्र साडी 450 रुपयांत 2 नग, फुलसाईज उशी 90 रुपयांत 1 नग, सियाराम शर्ट पॅन्ट सेट 600 रुपयांत 2 नग, सोलापुरी चादर 400 रुपयांत 2 नग, टॉवेल 90 रुपयांत 3 नग, सिंगल ब्लॅंकेट 900 रुपयांत 4 नग, डबल ब्लॅंकेट 900 रुपयांत 3 नग, सिंगल बेडशीट 250 रुपयांत 2 नग, डबल बेडशीट उशी कव्हरसह 500 रुपयांत 2 नग, उशी कव्हर फक्त 50 रुपयांत 3 नग, पायपुसणी फक्त 90 रुपयांत 3 नग, ब्रँडेड विमल परकर 100 रु. 1 नग, कॉटन गाऊन फक्त 400 रुपयांत 3 नग अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांसाठी देण्यात आली आहे.














